कालिदास

चरित्र

चरित्र

महाकवी कालिदास हे संस्कृत भाषेतील श्रेष्ठ कवी आणि नाटककार होते. त्यांची नाटके आणि काव्ये प्रामुख्याने वेद, रामायण, महाभारत आणि पुराणे यांवर आधारित आहेत. 'मालविकाग्निमित्र', 'अभिज्ञानशाकुंतल' आणि 'विक्रमोर्वशीय' ही तीन नाटके, 'रघुवंश' आणि 'कुमारसंभव' ही दोन महाकाव्ये, 'मेघदूत' हे खंडकाव्य आणि 'ऋतुसंहार' हे निसर्गवर्णनपर काव्य या सात रचना निश्चितपणे त्यांच्या मानल्या जातात. याशिवाय काही सुभाषिते आणि स्फुटकाव्येही त्यांच्या नावावर आहेत, मात्र ती त्यांचीच असल्याचे खात्रीने सांगता येत नाही. संस्कृत साहित्यातील सर्वश्रेष्ठ कवींमध्ये त्यांची गणना होते.

समुदायाने जोडले
बंद