केशवसुत

चरित्र

चरित्र

केशवसुत हे कृष्णाजी केशव दामले (७ ऑक्टोबर १८६६, मालगुंड, रत्नागिरी – ७ नोव्हेंबर १९०५, हुबळी) यांचे टोपणनाव. त्यांना 'आधुनिक मराठी काव्याचे जनक' मानले जाते. नव्या विषयांवर कविता करणारे ते आद्य मराठी कवी समजले जातात. 'आम्ही कोण?', 'नवा शिपाई', 'तुतारी', 'सतारीचे बोल', 'झपुर्झा', 'हरपले श्रेय', 'मूर्तिभंजन', 'गोफण' या त्यांच्या उल्लेखनीय कविता आहेत. इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा प्रकार 'सुनीत' या नावाने त्यांनी मराठीत लोकप्रिय केला. सुरुवातीला त्यांनी भडगाव येथील नगरपालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून काम केले. त्यांच्या कवितांचा संग्रह त्यांच्या मृत्यूनंतर १९१६ मध्ये हरी नारायण आपटे यांनी प्रकाशित केला. मालगुंड येथे त्यांचे स्मारक आहे.

समुदायाने जोडले
बंद