चरित्र
चरित्र
कमल देसाई (१० नोव्हेंबर १९२८ – १७ जून २०११) या मराठीतील प्रयोगशील लेखिका आणि मराठीच्या अध्यापिका होत्या. त्यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील यमकनमर्डी येथे झाला; बालपण आणि सुरुवातीचे शिक्षण मिरजेत झाले. एम.ए.साठी मुंबईत आल्यावर त्यांनी कथालेखनाला सुरुवात केली आणि त्यांच्या कथा 'सत्यकथा'त प्रसिद्ध होऊ लागल्या. अहमदाबाद, धुळे, निपाणी, भिवंडी, कागल अशा अनेक ठिकाणी त्यांनी मराठी शिकवले. देव, धर्म आणि विश्व हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख विषय होते; लैंगिकतेवरील पुरुषी दृष्टिकोनाचे वर्चस्व हाही त्यांचा विषय होता. 'काळा सूर्य' आणि 'हॅट घालणारी बाई' ही जोड-कादंबरी, 'रंग-१' (१९६२) आणि 'रंग-२' (१९९८) हे कथासंग्रह आणि 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' (१९५९) ही कादंबरी त्यांच्या नावावर आहे.
समुदायाने जोडले
बंद