चरित्र
चरित्र
शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व (८ एप्रिल १९२४, सुळेभावी, बेळगाव – १२ जानेवारी १९९२, देवास) हे हिंदुस्तानी शास्त्रीय गायक होते. घराण्यांच्या पारंपरिक भिंती भेदून त्यांनी स्वतःची आगळी गायकी घडवली. गायक वडिलांच्या प्रभावामुळे ते सहाव्या वर्षीच गाऊ लागले आणि सातव्या वर्षी गुरुकल्ल मठाच्या स्वामींनी त्यांना 'कुमार गंधर्व' हे नाव दिले, जे पुढे त्यांचे अधिकृत नाव झाले. १९३६ पासून अकरा वर्षे त्यांनी मुंबईत बा. र. देवधर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. १९४७ मध्ये गायिका भानुमती कंस यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
समुदायाने जोडले
बंद