छायाचित्र
खुशवंत सिंग

खुशवंत सिंग

इंग्रजी नाव
Khushwant Singh

चरित्र

चरित्र

खुशवंत सिंग (२ फेब्रुवारी १९१५ – २० मार्च २०१४) हे इंग्रजीत लेखन करणारे भारतीय लेखक आणि पत्रकार होते. त्यांचा जन्म ब्रिटिश भारतातील हदाली येथे आणि मृत्यू नवी दिल्ली येथे झाला. दिल्ली आणि लाहोरमध्ये शिक्षण घेतल्यावर त्यांनी केंब्रिजच्या किंग्ज कॉलेजमध्ये उच्चशिक्षण घेतले आणि लाहोर उच्च न्यायालयात वकिली केली. त्यांनी नियोजन आयोगाच्या 'योजना' मासिकाची स्थापना करून त्याचे संपादन केले. ते 'इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया', 'नॅशनल हेराल्ड' आणि 'हिंदुस्तान टाइम्स'चे संपादक होते. १९८० ते १९८६ या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते. 'ट्रेन टू पाकिस्तान' (१९५६) ही त्यांची प्रसिद्ध कादंबरी; तिचा मराठी अनुवाद अनिल किणीकर यांनी केला. १९७४ मध्ये त्यांना पद्मभूषण आणि २००७ मध्ये पद्मविभूषण मिळाले.

समुदायाने जोडले
बंद