लिओ टॉलस्टॉय

चरित्र

चरित्र

लिओ टॉलस्टॉय (मूळ रशियन नाव : काउंट ल्येव निकोलायविच तल्स्तोय; जन्म : ९ सप्टेंबर १८२८, यास्नाया पोल्याना, रशिया; मृत्यू : २० नोव्हेंबर १९१०, अस्तापोव्हो, रशिया) हे रशियन लेखक, कादंबरीकार, नाटककार, तत्त्वज्ञ आणि शिक्षणसुधारक होते. 'वॉर अँड पीस' आणि 'आना कारेनिना' या त्यांच्या कादंबऱ्या वास्तववादी ललित साहित्याचा उच्च बिंदू मानल्या जातात. या साहित्यकृतींमुळे ते जागतिक साहित्यातील महान साहित्यिक म्हणून ओळखले जातात. पुढील काळात त्यांची मते आदर्शवादी झाली आणि ते समाजप्रवर्तक म्हणून गणले जाऊ लागले. 'द किंग्डम ऑफ गॉड इज विदिन यू' या लेखनातून त्यांनी मांडलेल्या अहिंसक लढ्याच्या संकल्पनेचा महात्मा गांधी आणि मार्टिन ल्यूथर किंग यांच्यावर मोठा प्रभाव पडला.

समुदायाने जोडले
बंद