लक्ष्मण माने

इंग्रजी नाव
Laxman Mane

चरित्र

चरित्र

लक्ष्मण बापूराव माने (जन्म : १ जून १९४९) हे मराठी लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचा जन्म फलटणजवळील सोमंथळी येथे कैकाडी समाजात झाला. 'उपरा' या आत्मकथनामुळे ते 'उपराकार' म्हणून ओळखले जातात. 'उपरा'चे हिंदीत 'पराया' नावाने रूपांतर झाले असून इंग्रजी, गुजराती, तमिळ, फ्रेंच, मल्याळम आदी भाषांतही अनुवाद झाले. भटक्या-विमुक्त आणि मागासवर्गीयांच्या प्रश्नांवर ते काम करतात आणि उपेक्षितांविषयीचे परिवर्तनवादी विचार लेखनातून मांडतात. १९९० ते १९९६ या काळात ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. २७ मे २००७ रोजी त्यांनी मुंबईत समर्थकांसह बौद्ध धर्म स्वीकारला. सातारा जिल्ह्यातील करंजे येथे त्यांनी सावित्रीबाई फुले आश्रमशाळा (१९८८) सुरू केली.

समुदायाने जोडले
बंद