चरित्र
चरित्र
डॉ. माधव त्र्यंबक पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन (२१ जानेवारी १८९४, बडोदा – २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी कवी आणि रविकिरण मंडळाचे संस्थापक सदस्य होते. ते फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. मराठी साहित्यातील मुंबई विद्यापीठाची पहिली डी.लिट. पदवी त्यांना मिळाली. गझल आणि रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. इंग्रज कवी शेली याच्या 'ज्यूलियन अँड मॅडालो' या कवितेवरून त्यांनी 'ज्यूलियन' हे टोपणनाव घेतले, असे सांगितले जाते.
समुदायाने जोडले
बंद