माधवी देसाई

इंग्रजी नाव
Madhavi Desai

चरित्र

चरित्र

माधवी रणजित देसाई (२१ जुलै १९३३ – १५ जुलै २०१३) या मराठी लेखिका होत्या. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. भालजी पेंढारकर आणि लीला पेंढारकर यांच्या त्या कन्या आणि लेखक रणजित देसाई यांच्या पत्नी होत्या. पतीसोबतच्या नातेसंबंधांवर आधारित त्यांचे 'नाच गं घुमा' हे आत्मचरित्र अतिशय गाजले. त्यांच्या १५ कादंबऱ्या, एक आत्मचरित्र, काही कथासंग्रह आणि व्यक्तिचित्रसंग्रह अशी सुमारे ३५ पुस्तके आहेत. बेळगावजवळील कडोली येथे त्यांनी प्रा. तुकाराम पाटील यांच्या सहकार्याने साहित्य संमेलन सुरू केले; त्यानंतर सीमाभागात साहित्य संमेलने आणि मराठी भाषेची चळवळ वाढली. १९९० पासून त्या गोव्यात बांदिवडे येथे राहत होत्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळे २०१२ मध्ये त्या कन्या कवयित्री मीरा तारळेकर यांच्याकडे बेळगावला आल्या आणि तेथेच त्यांचे निधन झाले.

समुदायाने जोडले
बंद