मालती बेडेकर

चरित्र

चरित्र

मालती बेडेकर (१८ मार्च १९०५ – ७ मे २००१) या मराठीतील आद्य स्त्रीवादी लेखिका समजल्या जातात. त्यांचे माहेरचे नाव बाळुताई खरे; लेखिका कृष्णाबाई मोटे या त्यांच्या मोठ्या भगिनी. १९३८ मध्ये त्यांचा विवाह विश्राम बेडेकरांशी झाला. 'विभावरी शिरुरकर' या टोपणनावाने त्यांनी केलेल्या लेखनाने त्या काळी महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती; त्याआधी श्रद्धा, बी.के., कटुसत्यवादिनी अशा नावांनीही त्यांनी लेखन केले. त्यांनी सहा कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, पाच नाटके, प्रौढ साक्षरांसाठी चार पुस्तके आणि एक चित्रपटकथा लिहिली, तसेच पाच इंग्रजी पुस्तकांचे भाषांतर केले. 'कळ्यांचे निःश्वास' (१९३३), 'बळी' (१९५०), 'खरेमास्तर' (१९५३), 'शबरी' (१९५६) आणि 'घराला मुकलेल्या स्त्रिया' ही त्यांची पुस्तके आहेत.

समुदायाने जोडले
बंद