मामा वरेरकर

चरित्र

चरित्र

भार्गवराम विठ्ठल वरेरकर ऊर्फ मामा वरेरकर (२७ एप्रिल १८८३, चिपळूण – २३ सप्टेंबर १९६४) हे मराठी नाटककार, कादंबरीकार आणि लेखक होते. त्यांचे शालेय शिक्षण मालवण आणि रत्नागिरी येथे झाले; त्यानंतर ते टपाल खात्यात नोकरीस लागले. लहानपणी वडिलांबरोबर पाहिलेल्या कोकणातील दशावतारी नाटकांमुळे त्यांना नाटक लिहिण्याची प्रेरणा मिळाली आणि आठव्या वर्षीच त्यांनी 'नवीन रासक्रीडा' हे नाटक लिहिले. पुढे त्यांनी इब्सेन, मोलियर यांसारख्या पाश्चात्त्य नाटककारांचा अभ्यास केला. 'ललितकलादर्श' नाटक मंडळीचे ते लोकप्रिय नाटककार होते.

समुदायाने जोडले
बंद