चरित्र
चरित्र
मारुती चितमपल्ली (५ नोव्हेंबर १९३२ – १८ जून २०२५) हे मराठी वन्यजीव अभ्यासक आणि लेखक होते. त्यांचा जन्म सोलापूर येथे झाला. त्यांनी वनाधिकारी म्हणून ३६ वर्षे नोकरी केली; नोकरीदरम्यान आणि त्यानंतर मिळून सुमारे ६५ वर्षे त्यांनी जंगलात घालवली. जंगलातील प्राणीजीवन आणि त्याचे बारकावे त्यांनी ओघवत्या शैलीत रेखाटले. पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली आणि लेखक व्यंकटेश माडगूळकर यांच्याशी त्यांचा स्नेह होता. 'पक्षी जाय दिगंतरा' (१९८३) हे त्यांचे पुस्तक आणि 'चकवाचांदण : एक वनोपनिषद' हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. २००६ मध्ये सोलापूर येथे झालेल्या ८३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. २०२५ मध्ये त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला.
समुदायाने जोडले
बंद