छायाचित्र
मधु मंगेश कर्णिक

मधु मंगेश कर्णिक

चरित्र

चरित्र

मधु मंगेश कर्णिक हे मराठी कथाकार, कादंबरीकार, कवी आणि संवादलेखक आहेत. त्यांचा जन्म २८ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील करूळ येथे झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कणकवली येथे झाले. त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात, गोवा सरकारच्या प्रसिद्धी खात्यात माहिती अधिकारी म्हणून आणि मुंबईत सरकारचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले; ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे प्रसिद्धी अधिकारीही होते. 'कोकणी गं वस्ती' हा त्यांचा पहिला कथासंग्रह. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता. १९९० मध्ये रत्नागिरी येथे झालेल्या ६४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.

समुदायाने जोडले
बंद