मधुकर तोरडमल

चरित्र

चरित्र

प्रा. मधुकर तोरडमल ऊर्फ मामा तोरडमल (२४ जुलै १९३२ – २ जुलै २०१७, मुंबई) हे मराठी लेखक, अनुवादक, रूपांतरकार, नाट्यलेखक, निर्माते, दिग्दर्शक आणि नाट्य-चित्रपट अभिनेते होते. ते मूळचे अहमदनगरचे होते आणि २००३ मध्ये अहमदनगर येथे झालेल्या नाट्यसंमेलनाचे उद्‌घाटन करण्याचा मान त्यांना मिळाला. ते दहा वर्षांचे असताना वडिलांचे निधन झाले; त्यानंतर काकांनी त्यांना शिक्षणासाठी मुंबईत आणले. मुंबईतील पोद्दार शाळेत असतानाच त्यांच्या अभिनयाची सुरुवात झाली. शाळेत गणेशोत्सवात त्यांनी चिं. वि. जोशी लिखित 'प्रतिज्ञापूर्ती' हे नाटक बसवले.

समुदायाने जोडले
बंद