चरित्र
चरित्र
महर्षी अरविंद तथा श्रीअरविंद घोष (१५ ऑगस्ट १८७२, कलकत्ता – ५ डिसेंबर १९५०, पाँडिचेरी) हे विसाव्या शतकातील तत्त्वज्ञ आणि योगी होते. स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणतज्ज्ञ, भाषांतरकार, लेखक, संपादक आणि कवी अशा अनेक भूमिकांतून ते ओळखले जातात. वयाच्या सातव्या वर्षी ते शिक्षणासाठी इंग्लंडला गेले; लंडनच्या सेंट पॉल शाळेत आणि केंब्रिजच्या किंग्ज कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले आणि तेथे त्यांनी लॅटिन, ग्रीकसह अनेक युरोपीय भाषांवर प्रभुत्व मिळवले. इंग्लंडमधील चौदा वर्षांच्या वास्तव्यानंतर १८९३ मध्ये ते भारतात परतले. त्यानंतर १८९३ ते १९०६ या काळात त्यांनी बडोदा संस्थानाच्या सेवेत काम केले.
समुदायाने जोडले
बंद