चरित्र
चरित्र
मिलिंद बोकील (जन्म : १ मे १९६०) हे मराठी लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी मराठी आणि इंग्रजीत लेखन केले आहे. बारावीनंतरच ते जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीशी जोडले गेले आणि 'छात्र युवा संघर्ष वाहिनी'त काम केले. वयाच्या २१व्या वर्षी लिहिलेली 'पुन्हा सूर्य, पुन्हा प्रकाश' ही त्यांची पहिली कथा १९८१ मध्ये 'किर्लोस्कर' मासिकात प्रसिद्ध होऊन गाजली. पुणे विद्यापीठातून त्यांनी समाजशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. नैसर्गिक स्रोत व्यवस्थापन, आदिवासी व ग्रामीण प्रश्न ही त्यांची कार्यक्षेत्रे आहेत. त्यांच्या 'शाळा' कादंबरीवर नाटक, 'हमने जीना सीख लिया' हा हिंदी चित्रपट आणि सुजय डहाके दिग्दर्शित 'शाळा' हा मराठी चित्रपट निघाला; 'शाळा' चित्रपटाला २०११ चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. 'समुद्र' ही त्यांची दुसरी गाजलेली कादंबरी आहे.
समुदायाने जोडले
बंद