चरित्र
डॉ. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष (७ जून १९१३, दादर, मुंबई – १९ एप्रिल २०१०) हे मराठी समीक्षक आणि ललितलेखक होते. एल्फिन्स्टन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी इंग्रजी साहित्यासाठीचे वर्डस्वर्थ पारितोषिक मिळवले. १९३६ ते १९७१ या काळात त्यांनी अहमदाबाद, मुंबई आणि कोल्हापूर येथील महाविद्यालयांत इंग्रजीचे अध्यापन केले. 'अभिरुची' मासिकातील 'निषाद' या टोपणनावाने लिहिलेले 'वाद-संवाद' हे त्यांचे सदर गाजले. पु. ल. देशपांडे आणि रा. वा. अलूरकर यांच्यासोबत त्यांनी 'पुरुषराज अळूरपांडे' या संयुक्त टोपणनावाने लेखन केले. 'पाच कवी' (संपादन, १९४६), 'खर्डेघाशी', 'आकाशभाषिके', 'शालजोडी', 'अमलान', 'पंचम', 'पाक्षिकी', 'शब्दयात्रा' आणि 'भाषाविवेक' ही त्यांची महत्त्वाची पुस्तके आहेत. कुसुमावती देशपांडे यांच्यासोबत त्यांनी 'हिस्टरी ऑफ मराठी लिटरेचर' हा इंग्रजी ग्रंथ लिहिला. लेखिका विजया राजाध्यक्ष या त्यांच्या पत्नी होत.