चरित्र
चरित्र
मंगेश केशव पाडगांवकर (१० मार्च १९२९ – ३० डिसेंबर २०१५) हे मराठी कवी होते. त्यांचा जन्म वेंगुर्ला (आजचा सिंधुदुर्ग जिल्हा) येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत विषयांत एम.ए. केले आणि काही काळ मुंबईच्या रुइया महाविद्यालयात मराठी शिकवले. 'धारानृत्य', 'जिप्सी', 'सलाम', 'तुझे गीत गाण्यासाठी' हे त्यांचे काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. 'सलाम'साठी त्यांना १९८० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 'सांग सांग भोलानाथ', 'मी आनंदयात्री', 'सांगा कसं जगायचं' या त्यांच्या कविता लोकप्रिय आहेत. साठहून अधिक वर्षांच्या लेखन कारकिर्दीत त्यांनी इतर भाषांतील साहित्यकृतींचे अनुवादही भरपूर केले.
समुदायाने जोडले
बंद