मोरोपंत

चरित्र

चरित्र

मोरोपंत तथा मोरेश्वर रामचंद्र पराडकर (१७२९, पन्हाळगड – १५ एप्रिल १७९४, बारामती) हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्यपरंपरेतील श्रेष्ठ कवी होते; त्यांना 'मयूर पंडित' असेही म्हणतात. पन्हाळगडावर केशव पाध्ये आणि गणेश पाध्ये यांच्याकडे त्यांनी न्याय, व्याकरण, धर्मशास्त्र, वेदान्त आणि साहित्य यांचे अध्ययन केले. सुमारे १७५२ नंतर ते बारामतीस स्थायिक झाले आणि त्यांचे बहुतेक लेखन तेथेच झाले. सुमारे ४५ वर्षे अखंड काव्यरचना करणाऱ्या मोरोपंतांच्या नावावर २६८ काव्यकृतींची नोंद आहे; त्यांनी सुमारे ६० हजार आर्या आणि १०८ रामायणे रचली. पुण्यातील सावकार बाबूजी नाईक यांच्याकडे पुराणिक म्हणून त्यांना राजाश्रय लाभला होता.

समुदायाने जोडले
बंद