चरित्र
चरित्र
नरसिंह चिंतामण केळकर ऊर्फ तात्यासाहेब केळकर (२४ ऑगस्ट १८७२, मोडनिंब – १४ ऑक्टोबर १९४७, पुणे) हे मराठी पत्रकार, नाटककार आणि राजकारणी होते. ते 'केसरी' वृत्तपत्राचे संपादक होते. त्यांच्या प्रकाशित लेखनाची पृष्ठसंख्या सुमारे पंधरा हजार असून त्यात लोकमान्य टिळकांचे तीन खंडांचे चरित्र, 'मराठे आणि इंग्रज', 'भारतीय तत्त्वज्ञान', 'तोतयाचे बंड' हे नाटक आणि आठ कादंबऱ्यांचा समावेश आहे. त्यांची बहुतेक नाटके संगीत नाटके आहेत. या विपुल साहित्यकामगिरीमुळे त्यांना 'साहित्यसम्राट' म्हटले जाते.
समुदायाने जोडले
बंद