ना. धो. महानोर

चरित्र

चरित्र

नामदेव धोंडो महानोर ऊर्फ ना. धों. महानोर (१६ सप्टेंबर १९४२, पळसखेड, औरंगाबाद जिल्हा – ३ ऑगस्ट २०२३, पुणे) हे मराठी कवी, गीतकार, लेखक आणि प्रयोगशील शेतकरी होते. निसर्ग आणि ग्रामीण जीवनावरील कवितांमुळे ते 'रानकवी' म्हणून ओळखले जात. 'रानातल्या कविता' (१९६७) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह; त्यानंतर 'वही', 'पावसाळी कविता', 'अजिंठा', 'पानझड' हे संग्रह प्रसिद्ध झाले. 'गांधारी' ही कादंबरी आणि 'गावातल्या गोष्टी' हा लोककथासंग्रहही त्यांनी लिहिला. 'जैत रे जैत', 'एक होता विदूषक', 'दोघी' यांसारख्या चित्रपटांसाठी त्यांनी गीते लिहिली. ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. त्यांना १९९१ मध्ये पद्मश्री आणि २००० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

समुदायाने जोडले
बंद