चरित्र
चरित्र
नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे (१५ जून १९०७ – १ मे १९९३) हे समाजवादी विचारवंत, मराठी लेखक आणि स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचा जन्म कोकणातील हिंदळे येथे झाला आणि पुण्यात त्यांनी कायद्याची पदवी घेतली. गांधीजींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी भाग घेतला. १९४२ मध्ये गुलबर्गा तुरुंगात असताना लिहिलेली त्यांची दैनंदिनी 'कारागृहाच्या भिंती' नावाने १९४५ मध्ये प्रसिद्ध झाली. ते लोकसभा (१९५७–६२) आणि राज्यसभेचे सदस्य, पुण्याचे महापौर आणि १९७७ ते १९७९ या काळात युनायटेड किंग्डममधील भारताचे उच्चायुक्त होते. १९८१ ते १९८४ या काळात ते 'साधना' साप्ताहिकाचे संपादक होते. त्यांनी २५ हून अधिक पुस्तके लिहिली; 'करवंदे', 'सीतेचे पोहे', 'डाली', 'गुलबशी', 'शंख आणि शिंपले', 'चिनारच्या छायेत' ही त्यांतील काही.
समुदायाने जोडले
बंद