ना. सी. फडके

चरित्र

चरित्र

नारायण सीताराम फडके ऊर्फ ना. सी. फडके (४ ऑगस्ट १८९४, कर्जत, अहमदनगर जिल्हा – २२ ऑक्टोबर १९७८, पुणे) हे मराठी कादंबरीकार, कथाकार आणि मराठी लघुनिबंधाचे आद्य प्रवर्तक होते. व्यवसायाने ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते आणि कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून १९४९ मध्ये निवृत्त झाले. 'अल्ला हो अकबर!' (१९१७) ही त्यांची पहिली कादंबरी. 'कुलाब्याची दांडी', 'जादूगार', 'दौलत', 'अटकेपार', 'कलंकशोभा', 'झंझावात' या त्यांच्या कादंबऱ्या लोकप्रिय ठरल्या. तंत्रशुद्ध रचना आणि डौलदार भाषा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. त्यांनी 'रत्नाकर' मासिक आणि 'झंकार' साप्ताहिक सुरू केले. १९४० मध्ये रत्नागिरी येथील साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९६२ मध्ये त्यांना पद्मभूषण मिळाले.

समुदायाने जोडले
बंद