ना. सं. इनामदार

इंग्रजी नाव
N. S. Inamdar

चरित्र

चरित्र

नागनाथ संतराम इनामदार (१९२३ – २००२) हे मराठी कादंबरीकार होते. ऐतिहासिक कादंबरीलेखनासाठी ते ओळखले जातात; त्यांनी १६ ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या. 'झुंज', 'झेप', 'राऊ', 'मंत्रावेगळा', 'राजेश्री', 'शहेनशाह', 'शिकस्त' आणि 'घातचक्र' या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. 'राऊ' या कादंबरीचे 'राऊ स्वामी' या नावाने हिंदी भाषांतर भारतीय ज्ञानपीठाने प्रसिद्ध केले. 'इंद्रनील' हा त्यांचा कथासंग्रह आणि 'वाळल्या फुलांत' हे आत्मचरित्र आहे. १९९७ मध्ये अहमदनगर येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

समुदायाने जोडले
बंद