चरित्र
चरित्र
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (२९ मार्च १९४८, मुखेड, जि. नांदेड – ३० नोव्हेंबर २०२२) हे मराठी लेखक, कवी आणि समीक्षक होते. देगलूर महाविद्यालयातून बी.ए. करताना ते मराठी विषयात पहिले आले; १९८० मध्ये मराठवाडा विद्यापीठातून 'शंकरराव पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास' या विषयावर त्यांनी पीएच.डी. मिळवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ते प्राध्यापक होते. राजभाषा मराठीचे धोरण ठरवण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले.
समुदायाने जोडले
बंद