चरित्र
चरित्र
नारायण गंगाराम सुर्वे (१५ ऑक्टोबर १९२६ – १६ ऑगस्ट २०१०, ठाणे) हे कष्टकरी आणि कामगार वर्गाचा आवाज मानले जाणारे मराठी कवी होते. जन्मानंतर सोडून दिलेल्या या मुलाचा सांभाळ गिरणी कामगार गंगाराम सुर्वे यांनी केला. हॉटेलमध्ये पोऱ्या, गिरणीत बिगारी अशी कामे करत त्यांनी स्वतः लिहिणे-वाचणे शिकले आणि पुढे ते प्राथमिक शिक्षक झाले. 'ऐसा गा मी ब्रह्म' (१९६२) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह; त्यानंतर 'माझे विद्यापीठ' (१९६६), 'जाहीरनामा' आणि 'नव्या माणसाचे आगमन' हे संग्रह प्रसिद्ध झाले. त्यांना १९७३ मध्ये सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार, १९९८ मध्ये पद्मश्री, मध्य प्रदेश सरकारचा कबीर सन्मान आणि जनस्थान पुरस्कार मिळाला. १९९५ मध्ये परभणी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
समुदायाने जोडले
बंद