नाथमाधव

चरित्र

चरित्र

नाथमाधव हे द्वारकानाथ माधव पितळे (३ एप्रिल १८८२, मुंबई – २१ जून १९२८, मुंबई) यांचे टोपणनाव. ते लोकप्रिय मराठी कादंबरीकार होते. १९०५ मध्ये सिंहगड परिसरात शिकारीदरम्यान कड्यावरून पडल्याने त्यांचा कमरेखालील भाग लुळा झाला. उपचारांच्या काळात त्यांना वाचनाची गोडी लागली आणि त्यातून ते लेखनाकडे वळले. 'प्रेमवेडा' (१९०८) ही त्यांची पहिली कादंबरी. त्यांनी तीसहून अधिक सामाजिक व ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या. 'सावळ्या तांडेल', 'वीरधवल', 'डॉक्टर', 'देशमुखवाडी' आणि 'स्वराज्याचा श्रीगणेशा' ते 'स्वराज्यातील दुफळी' ही स्वराज्य कादंबरीमाला प्रसिद्ध आहे. स्त्रीशिक्षण आणि पुनर्विवाह यांचे ते पुरस्कर्ते होते.

समुदायाने जोडले
बंद