चरित्र
चरित्र
नीला सत्यनारायण (५ फेब्रुवारी १९४९ – १६ जुलै २०२०) या सनदी अधिकारी आणि मराठी साहित्यिक होत्या. त्यांचा जन्म आणि मृत्यू मुंबईत झाला. त्यांचे वडील वासुदेव आबाजी मांडके पोलीस खात्यात होते. शालान्त परीक्षेत १९६५ मध्ये संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवून त्या दिल्ली बोर्डात पहिल्या आल्या. इंग्रजी वाङ्मयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर १९७२ मध्ये त्या पहिल्याच प्रयत्नात आय.ए.एस. झाल्या. ३७ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक खात्यांत काम केले आणि त्या महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त झाल्या. त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या आणि हिंदी, मराठी व इंग्रजीत मिळून १३ पुस्तके लिहिली. काही मराठी आणि दोन हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. त्यांच्या कथेवर 'बाबांची शाळा' हा मराठी चित्रपट निघाला आणि त्याचे संगीतही त्यांचेच होते.
समुदायाने जोडले
बंद