निरंजन घाटे

इंग्रजी नाव
Niranjan Ghate

चरित्र

चरित्र

निरंजन घाटे (जन्म : १० जानेवारी १९४६) हे विज्ञानकथा, कादंबऱ्या आणि विज्ञानविषयक लेखन करणारे मराठी लेखक आहेत. त्यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला आणि शिक्षण पुण्यात झाले. पुणे विद्यापीठातून भूशास्त्रात एम.एस्सी. केल्यावर १९६८ ते १९७७ या काळात त्यांनी विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागात अध्यापन केले. नंतर ते आकाशवाणीत कार्यक्रम अधिकारी म्हणून दाखल झाले आणि विज्ञानाशी संबंधित सुमारे ६०० कार्यक्रम सादर केले. 'तरुण भारत', 'लोकमत', 'लोकसत्ता', 'मार्मिक' आदी वृत्तपत्रे आणि साप्ताहिकांत त्यांनी देवेन कौशिक, सुखदेव साळुंखे, बाळ मुळ्ये अशा अनेक टोपणनावांनी स्तंभलेखन केले. शास्त्रीय ग्रंथ आणि नियतकालिकांतील विज्ञानाचे ज्ञान सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या विज्ञानकथांना मराठी विज्ञान परिषदेचे पुरस्कार मिळाले आहेत.

समुदायाने जोडले
बंद