चरित्र
चरित्र
अनंत यशवंत खरे ऊर्फ नंदा खरे (१९४६ – २०२२) हे मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या स्वतंत्र आणि अनुवादित लेखनात समाजशास्त्रीय, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक विषयांना मध्यवर्ती स्थान आहे. 'अंताजीची बखर', 'बखर अंतकाळाची' आणि 'उद्या' या त्यांच्या कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांनी आयआयटी मुंबई येथून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि २००१ पर्यंत स्थापत्य अभियंता म्हणून काम केले; उजनी धरणाच्या बांधकामात त्यांचा मोठा वाटा होता. विवेकवादी आणि विज्ञानाधारित भूमिकेचा पुरस्कार हे त्यांच्या लेखनाचे ठळक वैशिष्ट्य आहे.
समुदायाने जोडले
बंद