चरित्र
चरित्र
डॉ. नरेंद्र अच्युत दाभोळकर (१ नोव्हेंबर १९४५ – २० ऑगस्ट २०१३) हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी समाजसुधारक आणि सामाजिक कार्यकर्ते होते. अघोरी प्रथा आणि अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी त्यांनी सुरुवातीला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीसोबत काम केले. १९८९ मध्ये त्यांनी 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती' ही स्वतंत्र संघटना सुरू केली आणि ते तिचे संस्थापक अध्यक्ष होते. २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.
समुदायाने जोडले
बंद