नरेंद्र जाधव

चरित्र

चरित्र

डॉ. नरेंद्र दामोदर जाधव (जन्म : २८ मे १९५३) हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि समाजशास्त्रज्ञ आहेत. रिझर्व्ह बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार आणि नियोजन मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून १९७३ मध्ये संख्याशास्त्रात बी.एस्सी. आणि १९८६ मध्ये अमेरिकेच्या इंडियाना विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. 'आमचा बाप आन् आम्ही' या आत्मचरित्रपर पुस्तकाचे जगातील वीस भाषांत अनुवाद झाले आहेत. अर्थशास्त्र, ललित साहित्य आणि सामाजिक विषयांवर त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजीत लेखन केले आहे.

समुदायाने जोडले
बंद