चरित्र
चरित्र
आचार्य नरहर अंबादास कुरुंदकर (१५ जुलै १९३२ – १० फेब्रुवारी १९८२) हे मराठी भाषा आणि साहित्याचे समीक्षक, समाजचिंतक आणि प्रभावी वक्ते होते. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा हे त्यांचे मूळ गाव. नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयात त्यांनी शिक्षक म्हणून काम केले आणि नंतर नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या पीपल्स कॉलेजचे प्राचार्यपद भूषवले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दोनदा बिनविरोध त्यांच्याकडे येऊनही त्यांनी ते नम्रपणे नाकारले. अनेक पुस्तकांना त्यांनी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिल्या; त्यांतील निवडक प्रस्तावनांचे 'ग्रंथवेध' हे संपादित पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. 'धार आणि काठ' या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ २०१० मध्ये नांदेडमध्ये 'नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान' स्थापन झाले.
समुदायाने जोडले
बंद