पां.वा. काणे

चरित्र

चरित्र

महामहोपाध्याय डॉ. पांडुरंग वामन काणे (७ मे १८८० – १८ एप्रिल १९७२) हे भारतशास्त्रज्ञ, संस्कृत विद्वान, कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील पेढे परशुराम येथे झाला. चाळीस वर्षांहून अधिक काळ केलेल्या संशोधनातून त्यांनी सुमारे ६,५०० पृष्ठांचा 'धर्मशास्त्राचा इतिहास' (हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र) हा पाच खंडांतील ग्रंथ सिद्ध केला. प्राचीन भारतातील सामाजिक कायदे आणि रीतिरिवाज यांचा ज्ञानकोश म्हणून हा ग्रंथ मानला जातो. या कार्यासाठी १९६३ मध्ये त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला.

समुदायाने जोडले
बंद