चरित्र
चरित्र
प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे (१३ ऑगस्ट १८९८ – १३ जून १९६९) हे मराठी लेखक, कवी, नाटककार, संपादक, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी आणि वक्ते होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील सासवडजवळील कोडित खुर्द येथे झाला. लंडन विद्यापीठातून त्यांनी शिक्षक पदविका घेतली. 'नवयुग' साप्ताहिक (१९४०) आणि 'मराठा' दैनिक (१९५६) त्यांनी सुरू केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे ते प्रमुख नेते होते. 'साष्टांग नमस्कार', 'तो मी नव्हेच' ही त्यांची नाटके, 'झेंडूची फुले' हा विडंबन काव्यसंग्रह आणि 'कऱ्हेचे पाणी' हे पाच खंडांतील आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'श्यामची आई' चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
समुदायाने जोडले
बंद