चरित्र
चरित्र
प्रिया तेंडुलकर (१९ ऑक्टोबर १९५४, मुंबई – १९ सप्टेंबर २००२, मुंबई) या मराठी लेखिका, अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या नाटककार विजय तेंडुलकर यांच्या कन्या. 'ती फुलराणी', 'गिधाडे', 'एक हट्टी मुलगी' इत्यादी नाटकांत तसेच श्याम बेनेगल यांच्या 'अंकुर' चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. दूरदर्शनवरील 'रजनी' मालिकेमुळे त्या घराघरांत पोहोचल्या. लेखिका म्हणून 'जन्मलेल्या प्रत्येकाला' (कथासंग्रह), 'ज्याचा त्याचा प्रश्न', 'जावे तिच्या वंशा', 'जगले जशी', 'असं ही' ही त्यांची पुस्तके उल्लेखनीय आहेत. 'जन्मलेल्या प्रत्येकाला'साठी त्यांना दमाणी साहित्य पुरस्कार मिळाला; तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता.
समुदायाने जोडले
बंद