प्रकाश आमटे

चरित्र

चरित्र

डॉ. प्रकाश आमटे हे समाजसेवक आणि लेखक असून बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत. २३ डिसेंबर १९७३ पासून ते पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे 'लोकबिरादरी प्रकल्प' चालवतात. या प्रकल्पांतर्गत स्थानिक आदिवासींसाठी दवाखाना चालवला जातो आणि लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही उपचार केले जातात. 'प्रकाशवाटा' हे त्यांचे पुस्तक अत्यंत लोकप्रिय असून २०१३ पर्यंत त्याच्या २५ आवृत्त्या निघाल्या; 'रानमित्र' (२०१३) हे त्यांचे दुसरे पुस्तक आहे. त्यांच्या जीवनावर 'डॉ. प्रकाश आमटे : द रिअल हीरो' (२०१४) हा चित्रपट निघाला, ज्यात नाना पाटेकर यांनी त्यांची भूमिका केली. २००२ मध्ये त्यांना पद्मश्री आणि २००८ मध्ये मॅगसेसे पुरस्कार मिळाला.

समुदायाने जोडले
बंद