प्रतिमा इंगोले

चरित्र

चरित्र

डॉ. प्रतिमा इंगोले या मराठी बालसाहित्यकार, कवयित्री, कथालेखिका आणि वैचारिक लेखन करणाऱ्या लेखिका आहेत. त्या लोकसाहित्याच्या अभ्यासक आहेत. नक्षलवाद, शेतमजूर, पंचमहाभूते, बलुतेदारी असे विविध विषय त्यांनी आपल्या साहित्यात हाताळले आहेत. विदर्भात सलग सहा वर्षे अभ्यास करून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लेखन केले. ग्रामीण स्त्री-पुरुषांचे वास्तव जीवन आणि ग्रामीण भागातील जीवनसंघर्ष त्यांनी आपल्या कथांमधून चितारला असून त्यावर उपाय सुचवण्याचा प्रयत्नही केला आहे. त्यांची ८० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे किमान दहा कथासंग्रह प्रकाशित झाले असून त्या प्रत्येकाला पुरस्कार मिळाला आहे. 'हजारी बेलपान' हा निखळ वऱ्हाडी बोलीतील त्यांचा पहिला कथासंग्रह, तर 'जावायाचं पोर' हा पहिला स्त्रीवादी कथासंग्रह आहे. १४ नोव्हेंबर २०१० रोजी सांगलीत झालेल्या ७व्या मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.

समुदायाने जोडले
बंद