चरित्र
चरित्र
प्रा. प्रवीण अनंत दवणे (जन्म : ६ एप्रिल १९५९) हे मराठी लेखक, कवी, गीतकार आणि पटकथालेखक आहेत. ते ठाणे येथे राहतात. 'ज्ञानसाधना महाविद्यालया'त प्राध्यापक असलेल्या दवणे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्णवेळ लेखनाला वाहून घेतले. त्यांनी २००० हून अधिक गीते लिहिली असून ती लता मंगेशकर, आशा भोसले, पं. जितेंद्र अभिषेकी, सुमन कल्याणपूर, सुरेश वाडकर, शंकर महादेवन आदी गायकांनी गायली आहेत. त्यांची ११० हून अधिक पुस्तके आणि कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ते उत्तम वक्ते असून 'दिलखुलास', 'सावर रे!' आणि 'वय वादळ विजांचं' हे त्यांचे कार्यक्रम गाजले. त्यांना महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार पाच वेळा मिळाला; मास्टर दीनानाथ प्रतिष्ठानचा शांता शेळके सरस्वती पुरस्कार (२०११) आणि गदिमा प्रतिष्ठानचा चैत्रबन पुरस्कार हे सन्मानही त्यांना मिळाले.
समुदायाने जोडले
बंद