चरित्र
चरित्र
पुरुषोत्तम भास्कर भावे (१२ एप्रिल १९१० – १३ ऑगस्ट १९८०) हे मराठी लेखक आणि ज्येष्ठ विचारवंत होते. त्यांनी १७ कादंबऱ्या, पाच नाटके, १४ लेखसंग्रह आणि दोन प्रवासवर्णने लिहिली; 'प्रथम-पुरुषी एक-वचनी' हे त्यांचे आत्मचरित्र आहे. ते सौंदर्यवादी लेखक मानले जातात. 'अकुलिना', 'अडीच अक्षरे', 'दर्शन', 'वर्षाव' आणि 'व्याध' या त्यांच्या कादंबऱ्या; 'पद्मिनी', 'महाराणी', 'विषकन्या' आणि 'स्वामिनी' ही नाटके; तर 'फुलवा', 'प्रतारणा', 'सतरावे वर्ष' आणि 'हिमानी' हे कथासंग्रह आहेत. 'रक्त आणि अश्रू' हा त्यांचा ललित लेखसंग्रह आहे. नागपूरच्या 'आदेश' आणि 'सावधान' या वृत्तपत्रांत त्यांनी स्तंभलेखन केले. १९७७ मध्ये पुणे येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या नावाने दरवर्षी १३ ऑगस्टला पु. भा. भावे पुरस्कार दिले जातात.
समुदायाने जोडले
बंद