छायाचित्र
पु. शि. रेगे

पु. शि. रेगे

चरित्र

चरित्र

पुरुषोत्तम शिवराम रेगे (२ ऑगस्ट १९१० – १७ फेब्रुवारी १९७८) हे मराठी कवी, लेखक आणि नाटककार होते. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात झाला. मुंबई आणि लंडन विद्यापीठांतून अर्थशास्त्राची पदवी घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र आणि गोव्यातील महाविद्यालयांत अध्यापन केले आणि १९७० मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. पाश्चात्त्य काव्याच्या लकबी मराठीत आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला; त्यांच्या कवितेत स्त्रीशक्ती विविध स्वप्निल रूपांत प्रकटते. 'फुलोरा', 'दोला', 'गंधरेखा', 'पुष्कळा', 'दुसरा पक्षी' हे त्यांचे कवितासंग्रह आहेत. 'सावित्री', 'अवलोकिता', 'रेणू' आणि 'मातृका' या कादंबऱ्या, तर 'छांदसी' हा समीक्षालेखांचा संग्रह आहे. १९५४ ते १९६० या काळात त्यांनी 'छंद' हे वाङ्मयीन द्वैमासिक संपादित केले.

समुदायाने जोडले
बंद