छायाचित्र
पुष्पा भावे

पुष्पा भावे

चरित्र

चरित्र

प्रा. पुष्पा भावे (माहेरच्या पुष्पा सरकार; २६ मार्च १९३९ – ३ ऑक्टोबर २०२०) या स्त्री चळवळीच्या कार्यकर्त्या, समीक्षक आणि रंगभूमीच्या भाष्यकार होत्या. मराठी आणि संस्कृत विषय घेऊन त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून एम.ए. पदवी मिळवली. सिडनहॅम, दयानंद, म. ल. डहाणूकर आणि चिनॉय महाविद्यालयांत मराठीचे अध्यापन करून त्या रुईया महाविद्यालयातून निवृत्त झाल्या. मराठी भाषा आणि मराठी नाटक हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय होते आणि अनेक गाजलेल्या नाटकांची त्यांनी केलेली समीक्षणेही गाजली. साहित्य, समाज आणि राजकीय चळवळींतील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते.

समुदायाने जोडले
बंद