चरित्र
चरित्र
रावसाहेब रंगराव बोराडे (२५ डिसेंबर १९४० – ११ फेब्रुवारी २०२५) हे मराठी कथाकार आणि कादंबरीकार होते. इयत्ता दहावीत असताना त्यांच्या 'वसुली' या कथेला 'सकाळ'च्या राज्यस्तरीय कथास्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले. साधी, सोपी आणि वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारी शैली आणि धक्कादायक शेवट ही त्यांच्या कथांची वैशिष्ट्ये मानली जातात. त्यांच्या कथांतून ग्रामीण भागातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती भेटतात आणि मराठवाडी बोलीचे अनेक विशेष प्रकट होतात. 'पाचोळा' या कादंबरीमुळे त्यांना 'पाचोळाकार बोराडे' अशी ओळख मिळाली.
समुदायाने जोडले
बंद