चरित्र
चरित्र
राजन खान हे मराठी कथालेखक आणि कादंबरीकार आहेत. कथा, कादंबरी, ललित आणि वैचारिक लेखन अशा विविध प्रकारांत त्यांनी विपुल लेखन केले आहे. 'आडवं आणि तिडवं', 'एकूण माणसांचा प्रदेश', 'एदेनाच्या बागेतील सर्प', 'जन्मजंजाळ', 'बाई जात' आणि 'सध्या सारं असं चालू आहे' हे त्यांचे कथासंग्रह आहेत. 'आता तू मोठा हो', 'जमीन', 'यतीम', 'रसअनौरस', 'हिलाल', 'हयात आणि मजार', 'वळूबनातली कामधेनू' या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. 'जिनगानी', 'जिरायत', 'किंबहुना' हे ललितलेखन, तर 'देश', 'पिढी', 'मानसमंत्रणा' आणि 'संगत विसंगत' हे वैचारिक लेखसंग्रह आहेत. 'कथा आणि कथेमागची कथा' (दोन भाग) हे पुस्तकही त्यांनी लिहिले. कुसुम अन्सल यांच्या हिंदी कादंबरीचा 'आणखी एक पंचवटी' हा अनुवादही त्यांनी केला आहे.
समुदायाने जोडले
बंद