चरित्र
चरित्र
राम बाळकृष्ण शेवाळकर (२ मार्च १९३१, अचलपूर – ३ मे २००९) हे मराठी लेखक, कवी आणि वक्ते होते. त्यांचे मूळ आडनाव धर्माधिकारी; मूळ गाव कयाधू नदीकाठचे शेवाळ होते. त्यांचे वडील भाऊसाहेब शेवाळकर हे कीर्तनकार होते; अशा घराण्यात जन्मल्याने त्यांच्यावर संस्कृत महाकाव्ये आणि मराठी संतसाहित्याचे संस्कार झाले. नागपूर विद्यापीठातून संस्कृत आणि मराठी विषयांत एम.ए. केल्यानंतर त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. वाशीम येथील शासकीय प्रशालेत ते शिक्षक होते.
समुदायाने जोडले
बंद