राममनोहर लोहिया

चरित्र

चरित्र

डॉ. राममनोहर लोहिया (२३ मार्च १९१० – १२ ऑक्टोबर १९६७) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत आणि समाजवादी राजकारणी होते. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अकबरपूर येथे झाला; त्यांचे वडील हिरालाल हे शिक्षक आणि गांधीजींचे अनुयायी होते. गांधीजींच्या हाकेला ओ देऊन वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी शाळा सोडली होती. बनारस आणि कलकत्ता येथे शिक्षण घेऊन त्यांनी १९३० मध्ये बी.ए. ही पदवी मिळवली. विद्यार्थिदशेपासूनच ते काँग्रेसची अधिवेशने आणि सायमन कमिशनविरोधी आंदोलनात सक्रिय होते.

समुदायाने जोडले
बंद