चरित्र
चरित्र
रंगनाथ गबाजी पठारे (जन्म : २० जुलै १९५०, जवळे, ता. पारनेर) हे मराठी कथालेखक, कादंबरीकार आणि समीक्षक आहेत. कथारचनेच्या विविध शक्यतांशी खेळणे हा त्यांच्या लेखनाचा स्वभाव मानला जातो. समकालीन वास्तवाला दिलेली तीव्र प्रतिक्रिया आणि मनातील घालमेल त्यांच्या कथांतून प्रत्ययाला येते. 'शंखातील माणूस' हा त्यांचा कथासंग्रह आहे. मराठी लघुकथेला तिच्या मूळ स्वरूपाकडे नेणारे लेखक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.
समुदायाने जोडले
बंद