रत्नाकर मतकरी

इंग्रजी नाव
Ratnakar Matkari

चरित्र

चरित्र

रत्नाकर मतकरी (१७ नोव्हेंबर १९३८ – १८ मे २०२०) हे मराठी गूढकथालेखक आणि नाटककार होते. नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, कादंबरी, ललित आणि वैचारिक लेखन अशा अनेक प्रकारांत त्यांनी लेखन केले; ते दिग्दर्शक, निर्माते आणि चित्रकारही होते. महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून त्यांनी सुमारे तीस वर्षे बालनाट्यांची निर्मिती केली. बावीस नाटके, २३ कथासंग्रह, तीन कादंबऱ्या आणि 'माझे रंगप्रयोग' हा आत्मचरित्रात्मक ग्रंथ अशी त्यांची साहित्यसंपदा आहे. 'गहिरे पाणी', 'अश्वमेध' या दूरचित्रवाणी मालिकांचे लेखन त्यांनी केले; त्यांचा 'इन्व्हेस्टमेन्ट' हा चित्रपट सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवला गेला. २००१ मध्ये पुण्यातील बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

समुदायाने जोडले
बंद