छायाचित्र
सानिया

सानिया

इंग्रजी नाव
Saniya

चरित्र

चरित्र

सानिया (जन्म : १० नोव्हेंबर १९५२, सांगली) या मराठी कथालेखिका आहेत; त्यांचे पूर्ण नाव सुनंदा कुलकर्णी (विवाहानंतर सुनंदा बलरामन). कथा, दीर्घकथा आणि कादंबरी अशा प्रकारांत त्यांनी आशयघन आणि प्रयोगशील लेखन केले आहे. वडिलांच्या बदल्यांमुळे त्यांचे शिक्षण अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे आणि मुंबई येथे झाले; पुणे विद्यापीठातून बी.कॉम. (१९७२) आणि मुंबई विद्यापीठातून एम.कॉम. (१९७४) केले. मद्रास, बंगलोर, भुवनेश्वर येथील वास्तव्याचा आणि अनेक देशांतील प्रवासाचा अनुभव त्यांच्या लेखनात दिसतो. १९६८ मध्ये 'हरवलेली पाऊलवाट' ही त्यांची पहिली कथा 'श्री' साप्ताहिकात प्रसिद्ध झाली; त्यानंतर 'स्त्री', 'मनोहर', 'किर्लोस्कर' आदी नियतकालिकांत त्यांच्या कथा आल्या. 'शोध' (१९८०) हा कथासंग्रह आणि 'अवकाश', 'आवर्तन', 'स्थलांतर' या कादंबऱ्या त्यांच्या नावावर आहेत.

समुदायाने जोडले
बंद