चरित्र
चरित्र
डॉ. सदानंद नामदेव देशमुख (जन्म : ३० जुलै १९५९) हे मराठी कवी, कादंबरीकार आणि कथाकार आहेत. त्यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अमडापूर या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. मराठी विषयात एम.ए. केल्यानंतर त्यांनी आचार्य (पीएच.डी.) ही पदवी मिळवली. कादंबरी, ललित, कविता आणि कथा अशा प्रकारांत त्यांनी लेखन केले आहे. 'बारोमास' ही त्यांची कादंबरी शेतकऱ्यांचे जीवन, दारिद्र्य, शोषण आणि ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांची व्यथा मांडते. या कादंबरीला २००४ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. तिचा हिंदी आणि इंग्रजीत अनुवाद झाला असून तिच्यावर 'बारोमास' हा हिंदी चित्रपटही निघाला. त्यांच्या साहित्यावर संशोधनही झाले आहे.
समुदायाने जोडले
बंद